श्रीलंकेविरुध्दच्या टेस्ट सीरिजसाठी झहीर आणि श्रीसंतचं कमबॅक

November 10, 2009 1:56 PM0 commentsViews: 1

श्रीलंकेविरुध्दच्या टेस्ट सीरिजसाठी झहीर आणि श्रीसंतचं कमबॅक10 नोव्हेंबरभारत-ऑस्ट्रेलिया वन डे सीरिजनंतर लगेचच भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होतेय. श्रीलंकेविरुध्द भारताची पहिली टेस्ट मॅच येत्या 16 नोव्हेंबरपासून अहमदाबादमध्ये सुरु होणार आहे. या टेस्ट सीरिजसाठी 15 खेळाडूंच्या भारतीय टीमची घोषणा मुंबईत करण्यात आली आहे. पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी हीच टीम असणार आहे.दुखापतीतून सावरलेला भारताचा प्रमुख फास्ट बॉलर झहीर खाननं भारतीय टीममध्ये पुनरागमन केलंय. टेस्ट प्लेअर राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मणलाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बराच काळ टीमबाहेर असलेल्या एस. श्रीसंतचाही पुन्हा एकदा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय टीममध्ये महेंद्रसिंग धोणी, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर, युवराज सिंग, एस. बद्रीनाथ, हरभजन सिंग, ईशांत शर्मा, प्रग्यान ओझा, अमित मिश्रा आणि मुरली विजय या खेळाडूंचा समावेश आहे.

close