मेट्रोचं कारशेड आरेमध्येच होणार,खडसेंची माहिती

June 10, 2015 7:19 PM0 commentsViews:

Eknath khadse1110 जून : मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत होण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पण, आता सरकारने सर्व विरोध झुगारून मेट्रोचं कारशेड आरेमध्येच होणार असं जाहीर केलंय. मुंबईत कुठेही मोठी जागा नसल्याचं कारण देत आरेची 30 हेक्टर जागा एमएमआरसीला हस्तांतरित करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. जमीन हस्तांतरणाला दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी परवानगीही दिलीये.

मुंबई गोरेगावमध्ये आरे कॉलनीत मेट्रो 3 साठी कारशेड प्रकल्प उभारण्यासाठी हालचाल सुरू झाली. त्यामुळे आरे कॉलनीतील 2 हजारांपेक्षा जास्त झाडांची कत्तल होणार होती. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याला कडाडून विरोध करत आंदोलनं केली. एवढंच नाहीतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मेट्रो कारशेडच्या विरोधात मैदानात उतरले होते. ‘आरे’साठी ‘कारे’ने उत्तर देणार असा इशारा राज यांनी दिला होता.

मोठ्या विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारशेड प्रकल्पाला तूर्तास स्थगितीही दिली होती. मेट्रोच्या कारशेडसाठी नवीन जागा शोधण्याचे काम सुरू असून, ती मिळाल्यावर याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. पण, आता पुन्हा एकदा राज्य सरकारने विरोध डावलून मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा आरे बचाव आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close