दिलीप वळसे-पाटलांनी भरला विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज

November 10, 2009 2:15 PM0 commentsViews: 3

10 नोव्हेंबरखातेवाटपाचा वाद मिटल्यानंतर आता राष्ट्रवादीत विधानसभेच्या अध्यक्षपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दिलीप वळसे-पाटील यांनी भरलेला अर्ज आणि नाराज बाबासाहेब कुपेकर यांच्याभोवती हे राजकारण फिरतंय. विधानसभा अध्यक्षपदासाठी दिलीप वळसे पाटील यांनी आपला अर्ज दाखल केलाय. गेल्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यावेळेही अध्यक्षपद मिळेल याबाबत उत्सुक होते. पण यावेळी मिळत नसल्याने ते नाराज आहेत. पक्षात कोणीही मला महत्व देत नाही. प्रामाणिक पणे काम करुन सुध्दा जर विधानसभा अध्यक्षपदाकरीता आपली दखल घेतली जात नसेल तर कार्यंकर्त्यांशी बोलुन आमदारकीचा राजीनामा देऊ असा इशारा बाबासाहेब कुपेकर यांनी दिला आहे.

close