कोकण रेल्वेचे दुपदरीकरण : प्रभूंच्या घुमजावामुळे गीतेंची कोंडी

June 11, 2015 8:59 AM0 commentsViews:

prabhu and geete

11 जून : कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणावाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नव्याने केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झालीये. मे महिन्याच्या अखेरीस कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा शुभारंभ केला जाईल, असं आश्वासन शिवसेनेचे अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यानी प्रभूंच्या भरवशावर रत्नागिरीत 2 मे रोजी दिलं होतं. मात्र दुपदरीकरणाचं काय ते कोकण रेल्वे बघून घेईल, त्यासाठी सरकार भांडवल कुठून आणणार?, असं म्हणत प्रभूंनी शिवसेनेच्या आश्वासनावर पाणी फेरलं आहे.

कोकण रेल्वे एक स्वतंत्र कंपनी असून कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी कोणत्या योजना आखायच्या आणि हे प्रकल्प कसे मार्गी लावायचे, याबाबत स्वतंत्र निर्णय घ्यायचे अधिकार कोकण रेल्वेला आहेत. त्यामुळे दुपदरीकरण प्रकल्प कसं आणि कधी राबवायचे ते बघून घेतील, असं म्हणत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी निधी उभारण्याची व्यवस्था करू, असं स्वत: रेल्वेमंत्र्यांनीच म्हटलं होतं. मग आता ही नवी भूमिका का घेतली, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या विधानातून कोकण रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला कुठलाही आर्थिक हातभार सरकारकडून मिळणार नसल्याची भूमिका स्पष्ट झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गावरूनच प्रवाशांना अजून किती काळ रेंगाळत प्रवास करावा लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close