आझमींच्या विरोधात नाशिकमध्ये निदर्शनं : मुंबईत दुकानाची तोडफोड

November 10, 2009 2:50 PM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबरअबू आझमींनी बाळासाहेब ठाकरेंबद्दलच अनुदगार काढून नव्या वादाला सुरुवात केली आहे. शिवसेनेचं पाणी काय आहे हे आम्ही दाखवून देऊ, असा इशारा शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनी आझमी यांना दिलाय. तर मुंबईत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंनी आमचा गैरसमज झाल्याचं म्हटलं असलं तरी, मुंबईत अबु आझमी यांच्या कुलाबा भागातल्या सिटी वॉक शुज या दुकानाच्या काचा फोडण्यात आल्या, या दुकानाची तोडफोड शिवसैनिकंनी केली असावी, अशी प्राथमिक माहिती आहे. या दुकानावर येऊन काही तरुणांनी दगडफेक केली आणि दुकानाचं नुकसान केलं. याप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु आहे. नाशिक जिल्हा शिवसेना कार्यकर्त्यांनी नाशिकच्या शालिमार चौक परिसरात अबू आझमी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, शिवीगाळ केली गेली. शेवटी पोलिसांच्या बंदोबस्तात अबू आझमी यांच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आलं. पुतळ्याचं दहन झाल्यानंतर, पोलीसांनी शिवसेनेच्या नेत्यांना अटक केली.

close