पुण्यात वडगाव पुलाजवळील भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

June 11, 2015 1:19 PM0 commentsViews:

11 जून : पुण्यात वडगाव पुलाजवळ डांबर वाहतूक करणार्‍या ट्रकने गुरुवारी सकाळी 3-4 गाड्यांना चिरडल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा आपघात इतका भीषण होता की मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भरधाव वेगात असलेल्या या ट्रकने चालकाचे गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. डंपरचा वेग जास्त असल्यामुळे अनेक गाड्यांना त्याची धडक बसली. डंपरच्या धडकेत आसपासच्या इतर गाड्यांचंही मोठ नुकसान झालं आहे. अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी वाहनांची मोठी कोंडी झाली होती. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close