‘फियान’चा मुंबईला धोका नाही : उत्तर महाराष्ट्र- गुजरातला इशारा

November 11, 2009 8:24 AM0 commentsViews: 19

11 नोव्हेंबर मुंबईला फयान वादळाचा थेट धोका नसल्याचं हवानान खात्यानं सांगितलं आहे. हे वादळ मुंबईपासून 70 किलोमीटर अंतरावरुन जाणार आहे. संध्याकाळी मुंबई आणि अलिबाग जवळच्या भागातून वादळ पुढे सरकणार आहे. आता वादळाचा वेग 15 ते 20 किलोमीटर असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अधिक सक्रीय झालेलं फियान वादळ मंगळवारी सकाळी आग्नेय दिशेकडे मँगलोर पासून 470 किलोमीटर अंतरावर पोहचलं होतं. बुधवारी गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी 85 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून शकतात. तसेच मोेठ्या प्रमाणात पावसाचा इशाराही हवामान खात्या कडून देण्यात आला आहे. या वादळाचा तडाखा दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या महुवा- डहाणू परिसराला बसेल. गुजरात आणि कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यताही आहे. फियान या चक्रीवादळाची लेव्हल 6 असून समुद्रसपाटीवरील लोकांना घरं खाली करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमाराना समुद्रात न जाण्याच्या सुचना हवामान खात्याने दिल्या आहेत. सुरक्षाव्यवस्थांनादेखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

close