भुजबळ कुटुंबीय गोत्यात;भुजबळांसह पुतण्या, मुलाविरोधात गुन्हा दाखल

June 11, 2015 7:37 PM0 commentsViews:

bhujbal family_11 जून : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ कुटुंबीय गोत्यात सापडले आहे. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पुतण्या समीर भुजबळ, मुलगा पंकज भुजबळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भुजबळांसह 17 जणांवरवर अँण्टी करप्शन ब्युरोने एफआयआर दाखल केलाय. या एफआयआरमध्ये कंत्राटदार चमणकर कुटुंबियांच्या चार जणाविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे.

दोनच दिवसांपूर्वी मुंबईत सरकारी भूखंड खासगी विकासकाला दिल्याप्रकरणी छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज पुन्हा एकदा भुजबळांना धक्का बसलाय. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 300 कोटीच्या बांधकामाच्या बदल्यात कंत्राटदाराला तब्बल दोन हजार कोटींचा व्यवहार झाल्याची बाब भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी उजेडात आणली होती.

गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असेल या प्रकरणाबाबत आज भुजबळांसह 17 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. यात भुजबळांचा पुतण्या समीर भुजबळ, मुलगा पंकज भुजबळांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ऍण्टी करप्शन ब्युरोने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन शासनाची फसवणूक आणि आर्थिक नूकसान करणे, कंत्राटदार चमनकर यांचा फायदा करण्यासाठी अंधेरी मुंबई RTO प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सरकारची दिशाभूल करणे, प्रकल्पाचा रिपोर्ट तयार करतांना असत्य आणि बनावट आर्थिक ताळे तयार करणे, खोटा रिपोर्ट असूनही तो सरकारपुढे ठेवणे, कंत्राटदाराच्या फायद्यासाठी तो मंजूर करुन घेणे आणि मोबदल्यात कंपनीच्या माध्यमातून आर्थिक मोबदला स्विकारणे असा ठपका ठेवण्यात आलाय.

मात्र, आम्ही सर्व काम पूर्ण केलंय. पण, आमच्या विरोधात भाजप सरकारने सुडबुद्धीने कारवाई केलीये असा आरोप समीर भुजबळ यांनी केलाय.

FIR मध्ये काय ठपका ठेवण्यात आलाय ?

– लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन शासनाची फसवणूक आणि आर्थिक नूकसान करणे
– कंत्राटदार चमनकर यांचा फायदा करण्यासाठी अंधेरी मुंबई RTO प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सरकारची दिशाभूल करणे
– प्रकल्पाचा रिपोर्ट तयार करतांना असत्य आणि बनावट आर्थिक ताळे तयार करणे
– खोटा रिपोर्ट असूनही तो सरकारपुढे ठेवणे, कंत्राटदाराच्या फायद्यासाठी तो मंजूर करुन घेणे
– मोबदल्यात कंपनीच्या माध्यमातून आर्थिक मोबदला स्विकारणे

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close