जेजुरीजवळ एसटी बस पलटी, 20 जखमी

June 11, 2015 10:28 PM0 commentsViews:

s t bus accident11 जून : जेजुरीजवळ एका एस.टी. बस ला अपघात झालाय. ही बस भिवंडीवरून गाणगापुरला जात होती. या बसचं पुढचं टायर फुटल्यामुळे या बसला अपघात झाला. या अपघातात 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले.

अपघातातील सहा जखमींना जेजुरीत प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आलंय. तर अन्य 20 जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आलंय. एसटीचे चालक वाहक देखील जखमी झाले आहेत. कोणत्याही प्रवाशाच्या जीवितास धोका नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close