फियानचा मुंबईला धोका नाही : पण दक्षतेचा इशारा

November 11, 2009 8:52 AM0 commentsViews: 2

11 नोव्हेंबर फियान चक्रीवादळाचा मुंबईला थेट धोका नाही. तसंच संध्याकाळी चारच्या सुमारास मुंबईच्या किनार्‍याजवळून हे वादळ गुजरातकडे जाईल अशी माहिती, हवामान खात्याचे विभागीय संचालक आर. शर्मा यांनी दिली आहे. मुंबईतल्या सर्व शाळा आणि सरकारी ऑफिसेस दुपारी 2 पूर्वी बंद करण्याची सूचना बीएमसीने दिली. पश्चिम रेल्वेनेही प्रवाशांच्या सोयीसाठी लोकलच्या फेर्‍या वाढवल्या आहेत. हवामान खात्याने वादळाचा इशारा दिल्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून बीएमसीने उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन दुपारी दीड नंतर शाळा- कॉलेजेसला सुट्टी देण्यात आली आहे. तसेच किनार्‍यालगतच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचंही मुंबईच्या महापौर शुभा राऊळ यांनी सांगितलं. तर रात्री अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

close