अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

November 11, 2009 10:29 AM0 commentsViews: 4

11 नोव्हेंबर अवकाळी पावसामुळे सध्या शेतात असलेल्या खरिपाच्या पिकांचं सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. काढणीला आलेला कापूस, सोयाबीन, भात या पिकांना पावसाचा फटका बसेल. नव्याने लागवड झालेलं कांदा,डाळींब आणि द्राक्षाचं पिकंही तडाख्यात सापडतील. सोलापुरातल्या 80 टक्के डाळींबाच्या बागांवर अगोदरच तेल्या रोग पडला आहे. कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाला हा पाऊस नुकसानकारकच ठरेल. त्यामुळे यंदाच्या आंबा उत्पादनात घट होऊ शकते. तसेच पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम नोव्हेंबरपासून सुरू झालेत. त्यामुळे ऊस तोडणीही चालू झाली आहे. पण या पावसामुळे ऊस तोडणीत अडथळे येत आहेत. त्यामुळे शेतात तोडून पडलेला ऊस अजून काही दिवस कारखान्यात पोहचू शकणार नाही. पण याचवेळी ज्वारी, हरभरा, करडई, सूर्यफूल, मोहरी, मका या पिकांना हा पाऊस पूरक ठरणार आहे.

close