रत्नागिरीच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा

November 11, 2009 10:32 AM0 commentsViews: 6

11 नोव्हेंबर रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीला वादळाच्या जोरदार तडाखा बसला आहे. वादळामुळे मिरे बंदरातल्या किनार्‍यावर समुद्रात 2 मच्छीमार नौका बुडाल्या. रत्नागिरी परिसरात अनेक झाडं उडमडून पडली आहेत. तर विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. मालवणलाही वादळाचा तडाखा बसल्याने 40 मच्छीमार ट्रॉलर आणि 60 ते 70 छोट्या बोटींचं नुकसान झालं. देवबाग मधल्या 6 कुटुंबांनी स्थलांतर केलं आहे. तर वादळामुळे मालवणमधली दळणवळण यंत्रणा कोलमडली आहे. लांजा आणि राजापूर भागात जोरदार पाऊस आणि प्रचंड वेगवान वार्‍यामुळे अनेक घरांची छपरं उडाली आहेत. वार्‍यामुळे झाडं रस्त्यावर पडल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहे.

close