बायकोसाठी कायपण, मंगळसूत्र शोधण्यासाठी त्याने चक्क तलावच रिकामा केला !

June 11, 2015 11:55 PM0 commentsViews:

11 जून : स्त्री हट्ट सर्वांत मोठा असं गमतीनं म्हटलं जातं…पण, अमरावतीत एका पतीनं आपल्या बायकोच्या हट्‌ट्पायी गावचा तलावच रिकामा केला. एवढे करूनही मंगळसूत्र काही सापडले नाही, पण तलाव मात्र रिकामा झाला आणि पतीवर वनविभागाकडून समाज देण्यचा बाका प्रसंग ओढवला,

पत्नीच्या प्रेमापोटी शहाजहानने ताजमहाल बांधला. पत्नीवरील प्रेम दाखवणारी अशी अनेक उदाहरणे इतिहासात आढळून येतात. मात्र पत्नी प्रेम दर्शविणारी प्रत्यक्ष दर्शविणारी घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावरील कामापूर या गावात घडली. रामू शिकारी बेलसरे हा पत्नीसह कामापूर गावात राहतो. गावात वनविभागाने नाल्यावर लहान तलाव बांधला आहे.amravati husband news

या तलावात आदिवासी बांधव मासेमारी करतात. हेच पाणी गावकरी कधी काळी पिण्यासाठीही वापरतात. रामू बेलसरे हा पत्नीसह तलावावर मासेमारीसाठी गेला. रामू मासेमारी करीत असताना त्याची पत्नी तलावाच्या कडेला कपडे धूत होती. दरम्यान, खाली वाकल्याने तिचे मंगळसूत्र तलावात पडले. ही बाब लक्षात येताच या दाम्पत्याने शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, मंगळसूत्र काही सापडले नाही.

अखेर रामूने परिसरातीलच एका शेतातील डिझेल इंजिन आणून तलावातील पाण्याचा उपसा सुरू केला. ते पाणी नाल्यात सोडले. शेतात ओलितासाठी पंप लावला असेल असे वाटल्याने त्याकडे कुणी लक्ष दिले नाही. मात्र, संपूर्ण तलाव रिकामा झाल्यानंतर ही बाब उघड झाली आणि एकच खळबळ उडाली. आपल्या पत्नी वर आपले अतूट प्रेम असून, तिने मला हट्ट धरला त्या त्यामुळे हा पराक्रम केला असल्याचे या पत्नी वेड्या रामूचं म्हणणं आहे. रामू बेलसरेच्या प्रतापाची चर्चा वनाधिकार्‍यांपर्यंत पोहोचली.

वनकर्मचार्‍यांनी तलावाचा पंचनामा करून रामूची शोधमोहीम सुरू केली व रामू ला समज दिला. वन व्यवस्थापन समितीची दखल पावसाळ्यात टेकडीवरील वाहते पाणी याच तलावात साचते. डिझेल पंपाद्वारे रिकामा केलेला कामापूर वन व्यवस्थापन समितींतर्गत हा ‘चेक डॅम’ तयार करण्यात आला. त्याची देखरेख समिती करते. उन्हाळ्यात पाण्याची सर्वाधिक गरज असताना रामू बेलसरे याने केलेले कृत्य गंभीर आहे. त्यामुळे समिती आणि वन कर्मचार्‌यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. घटनेचा पंचनामा केला. या विचित्र प्रकाराचा वन कर्मचार्‍यांनी पंचनामा केला. हा तलाव पुन्हा भरण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close