नागपूर सेंट्रल जेलमधून पळालेल्या 8 कैद्यांविरोधात मोक्का दाखल

June 12, 2015 11:15 AM0 commentsViews:

nagpur central jail

12 जून : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून फरार झालेल्या पाच कैद्यासह त्यांना मदत करणार्‍या तिघांवर मोक्का दाखल करण्यात आला आहे.

31 मार्च रोजी राजा गौसच्या टोलीतील तीन सदस्य आणि इतर दोघे असे एकूण पाच कैदी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून फरार झाले आहेत. या पाच कैद्यावर मोक्का दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना मदत करणारे आणखी तिघांवरही मोक्का लावला गेला आहे.

मध्यवर्ती कारागृहातून सत्येंद्र गुप्ता, बलबेश यादव, बिशनसिंग उके, शोएब खान , आकाश ठाकूर, आणि यांना मदत करणारे नेपाली शीलिकराम खत्री, गणेश शर्मा, नवाब तोहीत खान यांच्यावर मोक्का दाखल करण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close