बोगस पदवी प्रकरणी जितेंद्रसिंह तोमर यांची आपमधून हकालपट्टी?

June 12, 2015 1:26 PM0 commentsViews:

tomar

12 जून : बोगस पदवीप्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकलेले आपचे नेते आणि दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

बोगस पदवीप्रकरण उघडकीस आल्यानंतर तोमर यांनी बचावासाठी पुरावा म्हणून सादर केलेली माहितीसुद्धा खोटी असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. तोमर यांनी आरटीआयची एक प्रत पुरावा म्हणून दाखवली होती, त्यामुळे केजरीवाल यांनी सुरुवातीला त्यांची पाठराखण केली. पण नंतर हा पुरावाचा खोटा निघाल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

तोमर यांच्या कायद्याच्या पदवीची पडताळणी करण्यासाठी त्यांना आज बिहारला नेण्यात येणार आहे. त्यामुळे तोमर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close