राहुल गांधींनी घेतली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांची भेट

June 12, 2015 1:56 PM0 commentsViews:

rahul gandhi

12 जून : राहुल गांधी हे गेले काही दिवस वेगवेगळ्या आंदोलनातून चर्चेत येत आहेत.नवी दिल्लीत सफाई कर्मचार्‍यांना पगार वेळेवर मिळत नसल्याने सफाई कर्मचार्‍यांनी आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाला राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सफाई कर्मचार्‍यांच्या वेतनाचा मुद्दा पेटलेला आहे. दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपासुन काम करुनही वेतन मिळत नसल्याने महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी 10 दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे दिल्लीत अस्वच्छता पसरली आहे. याबाबत राहुल गांधी यांनी दिल्लीचे आप सरकार आणि केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. तसंच या कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close