हेमंत करकरेंचं बुलेटप्रुफ जॅकेट गहाळ

November 11, 2009 1:19 PM0 commentsViews: 12

11 नोव्हेंबर 26/11च्या रात्री दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी घातलेले बुलेटप्रुफ जॅकेट गहाळ झालं आहे. करकरेंच्या पत्नी कविता करकरेंनी माहितीच्या अधिकाराखाली घेतलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली. अतिरेकी कसाब आणि त्याच्या साथीदारांशी लढताना करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर शहीद झाले. त्यांचे मृतदेह सेंट झेव्हियर्स कॉलेजच्या गल्लीत होते. तेथून हे मृतदेह एटीएसमधल्या पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेले. तपास अधिकार्‍यांनी या पोलिसांना करकरेंच्या जॅकेटविषयी विचारले असता हे जॅकेट डॉक्टरांनीच काढल्याची माहीती त्यांनी दिली. पण हे जॅकेट पोलिसांनीच काढल्याचं हॉस्पिटलचं म्हणणं आहे.

close