‘मी लाच स्वीकारलेली नाही, खटल्यांमधून निष्कलंक बाहेर पडेन’

June 12, 2015 7:30 PM0 commentsViews:

67bhujbal12 जून : आपल्याविरोधात दाखल झालेले हे खटले केवळ मनस्ताप देणारे आणि नाव बदनाम करणारे आहेत. मी कधीच लाच स्वीकारलेली नाही, गुन्ह्यांच्या खटल्यांमधून निष्कलंक बाहेर पडेन अशा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय. छगन भुजबळ यांनी आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. कोर्टात जरी प्रकरण असलं तरी योग्य ती शहानिशा करून खटले दाखल करावे, सरकारनं सुडबुद्धीने वागू नये, मी सुद्धा गृहमंत्रीपद सांभाळलेले आहे, पण हा प्रकार अतिशय दुदैर्वी अशी खंतही भुजबळ यांनी व्यक्त केली.

छगन भुजबळ यांच्या विरोधात एकाच आठवड्यात दोन घोटाळ्यांमध्ये एफआयआर दाखल झालीये. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना सरकारी भूखंड प्रकरणीही एफआयआर दाखल झालाय. यावर भुजबळ म्हणतात, ही दोन्ही प्रकरणं एक किंवा दोन महिन्यांमध्ये मंजूर झालेली नाहीत. दोन-दोन, तीन-तीन वर्षे फायली फिरल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीने दोनदा तपासून मान्यता दिली. त्यात काहीतरी खुसपटं काढून जे काही खटले दाखल होतायत ते कोर्टात टिकणारे नाहीत. हे खटले केवळ मनस्ताप देणारे आणि नाव बदनाम करणारे आहेत. ते आणखीही खटले दाखल करतील. आम्ही कोर्टात याचं निश्चितपणे समर्पक उत्तर देऊ असा दावा भुजबळांनी केली.

तसंच याममध्ये आम्ही काहीही बेकायदेशीर केलेलं नाही. काही लोकांनी तक्रारी करायच्या, कोर्टात जायचं, त्याचा बाऊ करायचा, त्याद्वारे केसेस दाखल करायच्या. कोर्टात जरी प्रकरण असलं तरी योग्य ती शहानिशा करून खटले दाखल करा असा आव्हानही भुजबळांनी दिलं.

सरकारनं सुडबुद्धीने वागू नये. मी सुद्धा गृहमंत्रीपद सांभाळलेले आहे. पण आमच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहे हा प्रकार अतिशय दुदैर्वी आहे. अजित पवार माझे सहकारी आहे त्यांची चौकशी सुरू आहेच. तेही आपली बाजू मांडतील आणि दूध का दूध, पानी का पानी करतील असंही भुजबळ म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close