भाजपाचे एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते

November 11, 2009 1:22 PM0 commentsViews: 48

11 नोभाजपचे गटनेते एकनाथ खडसेंची विधानसभेच्या विरोधीपक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभेत एकनाथ खडसेंच्या अभिनंदनाचा ठराव बुधवारी संमत करण्यात आला. युतीमध्ये विरोधीपक्षनेते पदावरून निवडणुक निकालानंतर वाद होता. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी या पदावर दावा केला होता. मात्र भाजपचे 46 तर शिवसेनेचे 44 आमदार निवडून आल्याने भाजपाने विरोधी पक्षनेते पद आपल्यालाच मिळाले पाहिजे यासाठी आक्रमक भुमिका घेतल्याने शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपद भाजपला बहाल केले.

close