रवी शास्त्री कोच झाले तर वर्षाला 7 कोटी कमावतील ?

June 12, 2015 8:59 PM0 commentsViews:

ravi shashtri412 जून : माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांचीच टीम इंडियाचे कोच म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच शास्त्री यांच्याकडे कोच म्हणून सूत्रं सोपविण्यात येतील. तसं झाल्यास शास्त्री यांना वर्षाला 7 कोटी रुपये इतकी घसघशीत कमाई मिळेल. आजपर्यंत टीम इंडियाच्या कोणत्याही प्रशिक्षकाला इतकी मोठी रक्कम मिळालेली नाही.

त्यामुळे शास्त्री सर्वात महागडे कोच ठरतील. डंकन फ्लेचर यांचा करार आधीच संपल्यामुळे बीसीसीआय कोचच्या शोधात आहे. गेल्या वर्षी इंग्लंड दौर्‍यापासून शास्त्री यांची टीम इंडियाचे डायरेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली होती, त्यानंतर टीमची कामगिरी सुधारलेली पाहायला मिळाली. अलीकडेच टीम इंडियाचे कोच म्हणून राहुल द्रविडच्या नावाची चर्चा सुरू होती. पण त्याच्याकडे अ टीम आणि अंडर-19च्या टीमची जबाबदारी सोपवण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close