पद्मसिंहांना 24 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

November 11, 2009 1:24 PM0 commentsViews: 5

11 नोव्हेंबर खासदार पद्मसिंह पाटील यांचा जामीन अर्ज लातूर सेशन कोर्टाने फेटाळला आहे. त्यांना 24 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्त्येची सुपारी दिल्याचा आरोप पद्मसिंह पाटीलांवर आहे. यासंदर्भात पद्मसिंहांनी सुप्रिम कोर्टात जामीन मागीतला होता. पण कोर्टानं जामीन नाकारत आठ दिवसाच्या आत पोलीसांना शरण जाण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत बुधवारी संपली.

close