महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

June 13, 2015 1:31 PM0 commentsViews:

maharashtra sadam13 जून : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तीन अधिकार्‍यांचं निलंबन करण्यात आलंय. एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता अनिलकुमार गायकवाड यांना निलंबित करण्यात आलंय. चीफ आर्किटेक्ट बिपीन संख्ये, अधिक्षक अभियंता संजय सोळंकी या तीन अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय.

महाराष्ट्र सदन घोटाळा एफआयआरमध्ये या तीघांचा उल्लेख आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. अनिल गायकवाड हे भाजपचे लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांचे मोठे भाऊ आहेत. अनिल गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++