ठाण्यात विवियाना मॉलमध्ये स्वच्छतागृहात महिलेचं चोरून चित्रीकरण

June 13, 2015 3:28 PM0 commentsViews:

thane viviana mall13 जून : ठाण्यात विवियाना मॉलमध्ये महिला स्वच्छतागृहात चोरुन मोबाईल चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झालाय. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

मागील रविवारी 7 जूनच्या रात्री ही घटना घडलीय. महिला आपल्या पतीसह विवियाना मॉलमध्ये खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी महिला स्वच्छतागृहात गेली असता स्वच्छतागृहाच्या लागून असलेल्या रूम मधून एक अज्ञात इसम मोबाईलद्वारे चित्रीकरण करत असल्याचं
महिलेला समजताच ती स्वच्छातगृहातून बाहेर पडली आणि पतीला घडलेली प्रकार सांगितला. पतीने रूममध्ये पाहणी केला असा अज्ञात इसम धक्का देऊन पळ काढला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. त्या अज्ञात इसमाचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेमुळे मॉलमध्ये महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close