एमसीए निवडणुकीच्या आखाड्यात सेना विरुद्ध पवार सामना

June 13, 2015 7:57 PM0 commentsViews:

mac election sena vs pawar13 जून : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक चुरशीची होणार आहे. शिवसेना विरुद्ध शरद पवार असा सामना आता रंगणार आहे. शिवसेनेकडून प्रताप सरनाईक, राहुल शेवाळे रिंगणात कायम असणार आहे. उपाध्यक्षपदासाठी सरनाईक आणि कार्यकारिणी सदस्यत्वासाठी शेवाळे निवडणूक लढवणार आहे. तर शरद पवारांविरोधात विजय पाटील लढत देणार आहे.

एमसीए निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. आज शेवटच्या दिवसी शिवसेना रिंगणातच राहणार आहे ठाम पक्क झालं.. पण उपाध्यक्षपदासाठी राहुल शेवाळे ऐवजी आता प्रताप सरनाईक लढणार आहे. तर कार्यकारिणी सदस्यत्वासाठी सरनाईकांऐवजी शेवाळे रिंगणात असणार आहेत. या दोघांनीही दोन्ही जागांवर उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्येकी एकेक अर्ज मागे घेतला जाणार आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार हे अर्ज मागे घेण्यात येत आहेत. त्यामुळे उपाध्यक्षपदाच्या 2 जागांसाठी 4 उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे प्रमुख लढत ही प्रताप सरनाईक विरूद्ध भाजपचे नेते आशिष शेलार आणि ऍबी कुरविला विरुद्ध दिलीप वेंसरकर अशा थेट सामना रंगणार आहे. तर अध्यक्षपदासाठी शरद पवार विरुद्ध विजय पाटील यांच्यात लढत होतेय. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही एमसीए उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतलीये. पण, त्यांच्याकडील हक्काची तीन मतं ते नेमके कोणाच्या पारड्यात टाकणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close