पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया वन डे रद्द

November 11, 2009 1:42 PM0 commentsViews: 1

11 नोव्हेंबर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणारी सातवी आणि शेवटची वन डे पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये बुधवारी डे नाईट मॅच खेळवली जाणार होती. पण मंगळवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा वेग बुधवारीही कायम राहिल्याने हि मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी संध्याकाळी पाच वाजता मैदानाची पाहणी करुन अखेर मॅच रद्द झाल्याचं घोषित करण्यात आलं. ऑस्ट्रेलियानं ही वन डे सीरिज 4-2 अशी याआधीच जिंकली आहे.

close