माझी शैक्षणिक पदवी खरीच, लोणीकरांचा दावा

June 13, 2015 6:55 PM0 commentsViews:

babanrao lonikar413 जून : शैक्षणिक पदवी आणि द्विपत्नीच्या वादातून या मंत्रीमहोदयांची चांगलीच राजकीय अडचण झाल्यानंतर अखेर पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर बोललेत. आपली शैक्षणिक पदवी खरीच असल्याचा दावा लोणीकर यांनी केलाय.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे परतुर इथलं लालबहादुर शास्त्री महाविद्यालयात त्यांच्याकडे आपलं रेकॉर्ड असण्याचे काही कारण नाही असा खुलासा मंत्री बबन लोणीकर यांनी केला. आपल्या दृष्टीने हा विषय संपलाय. दोन पत्नी बाबत विचारले असता कोणाच्याही व्यक्तिगत जीवनात ढवळाढवळ करू नये अन्यथा कायदेशीर मार्गाने जाऊ, असा इशारा त्यांनी दिला. लोणीकर यांच्या दोन पत्नी असून त्यांनी प्रतिज्ञापत्रात एकाच पत्नीचा उल्लेख केला असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. मतदार यादीत लोणीकरांच्या दोन्ही पत्नीची नावं आहेत तर निवडणूक प्रतिज्ञापत्रात मात्र, लोणीकरांनी एकच पत्नी असल्याचं दाखवलंय. त्यामुळे हा सगळा वाद उत्पन्न झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close