विधानसभेतल्या गोंधळाप्रकरणी मनसेची दिलगिरी

November 11, 2009 1:48 PM0 commentsViews:

11 नोव्हेंबर विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठीतून शपथ घेण्यावरुन घातलेल्या गोंधळाप्रकरणी मनसेनं अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. निलंबित आमदारांची शिक्षा कमी करा अशी मागणी करत गटनेते बाळा नांदगावकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण अबू आझमींच्या संदर्भात दिलगिरी व्यक्त करण्यास मनसेने नकार दिला आहे. तसेच अबू आझमीना निलंबीत करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. मनसेचे शिशिर शिंदे, रमेश वांजळे, राम कदम आणि वसंत गिते या चार आमदारांवर विधानसभेत गैर वर्तवणुक केल्याप्रकरणी चार वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

close