वडाळ्यात ऑईल टँकची आग नियंत्रणात

June 13, 2015 9:55 PM0 commentsViews:

oil depo fire 113 जून :वडाळ्यात मुंबई पोर्ट ट्रस्टजवळ इंडियन ऑईल कंपनीच्या ऑईल टँकला भीषण आग लागली होती. तीन ते चार तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आलीये. आग नियंत्रणात आली असून धोक्याच्या बाहेर आहे अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिलीये. पेट्रोल साठवणुकीच्या टाक्यांमध्ये गळती झाल्यामुळे ही संध्याकाळी आग पसरली होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबई पोर्ट ट्रस्टजवळ इंडियन ऑईल कंपनीच्या ऑईल टँकला भीषण आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अत्यंत संवेदनशील असलेल्या भागात टँकला आग लागल्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून ईस्टर्न फ्री वेवरील वाहतूक बंद करण्यात आला होता. इंडियन ऑईलच्या टँकमधून पेट्रोल गळती झालं होतं. टँकला पुरवठा करणार्‍या पाईपमधून सप्लाय थांबवण्यात आलंय. पण, पेट्रोल अधिक प्रमाणात लिक झाल्यामुळे टँकजवळ आग लागली होती. बीपीसीएलच्या कर्मचार्‍यांनी सप्लाय बंद केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि इंडियन ऑईलच्या कर्मचार्‍यांनी मिळून आग नियंत्रणात आणली असून कोणताही धोका नाही अशी माहिती मुख्य अग्निशमन सल्लागार एम.व्ही देशमुख यांनी दिली.

सकाळपासून टँकच्या दुरस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे गळती सुरू झाली होती. आगीची शक्यता लक्षात घेऊन इंडियन ऑईलच्या कर्मचार्‍यांनी उपाययोजना करून ठेवली होती. मात्र, संध्याकाळी आग नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आलं होतं. घटनास्थळी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे 15 फायर इंजिन दाखल झाले होते. चार ते पाच तासांच्या प्रयत्नांतर आग आटोक्यात आण्यात जवानांना यश आलं. मात्र, इंडियन ऑईल कंपनीनं मेन्टेनसकडे दुर्लक्ष केल्यामुळे आग लागली असावी असा आरोप करण्यात येतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close