वसई-विरार निवडणूक: 50 टक्के मतदान झाल्याचा अंदाज

June 14, 2015 5:09 PM0 commentsViews:

vasai voting

14 जून : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झालं असून जवळपास 50 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकूण 620 मतदान केंद्रांवर 6 लाख 87 हजार मतदार 111 नगरसेवक निवडणार आहेत. त्यासाठी एकूण 367 उमेदवार या निवडणुकीत आमने सामने ठाकले आहेत. पावसाचे वातावरण लक्षात घेता मतदान प्रक्रियेत काही प्रमाणात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने निवडणूक यंत्रणेने तयारी केली आहे. तर 20 अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.

वसई-विरार महानगरपालिकेत 26 वॉर्ड वाढवण्यात आल्यामुळे आता ही निवडणूक 115 वॉर्डमध्ये रंगणार आहे. ज्यांपैकी चार उमेदवारांची आधीच बिनविरोधी निवड झाली आहे. शिवसेना, भाजप आणि जन आंदोलन पक्ष या तीनही पक्षांना बहुजन विकास आघाडीचं तगडं आव्हान आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close