#मान्सूनअलर्ट : पाठवा तुमच्या परिसरातील पावसाळ्यातील समस्यांचे फोटो

June 14, 2015 8:21 PM0 commentsViews:

Web Monsoon update
14 जून : राज्यभरात आता मान्सूनचं आगमन झालं असून सर्वदूर वरुणराजे बरसत आहे. पण, पावसाळा म्हटलं की, पावसाच्या समस्याही आल्याच. कुठे पाणी तुंबलेलं असतं तर कुठे पावसामुळे वाहतूक विस्कळीत होते. मुंबईत तर पावसामुळे लोकल वाहतूक विस्कळीत होणे हे नेहमीचंच. हे झालं शहरांपुरतं. पण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसामुळे दरडी कोसळणं, नद्यांना पूर येणं, वीज कोसळणं, खरीप हंगामात पाऊस कसा असणार अशा अस्मानी संकटाला सर्वांना तोंड द्यावं लागतं. म्हणूनच आयबीएन लोकमतने हाती घेतलीये #मान्सूनअलर्ट मोहीम…

आम्ही तुम्हाला देणार आहोत पावसाची प्रत्येक अचूक अपडेट्स…वेळोवेळी आणि क्षणाक्षणाला….कुठे पाणी साचलं, कुठे लोकल सेवा विस्कळीत झाली, पावसाचा अंदाज यासह पावसाची प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत… #मान्सूनअलर्ट मोहिमेत….तुम्हीही या मोहिमेत सहभागी होऊ शकता…तुम्ही तुमच्या परिसरात पावसाच्या समस्या, पावसाची माहिती आणि फोटो आम्हाला पाठवू शकता… तुम्हाला फक्त एवढंच करायचंय… पावसाची माहिती आणि समस्येचा फोटो आम्हाला 9167678594 या नंबर पाठवायचा… तसंच तुम्ही फोटो आमच्या ट्विटर अकाऊंट @ibnlokmattv वरही पाठवू शकता…किंवा याच बातमीखालील कमेंट बॉक्समध्ये फोटो अपलोड करू शकता… चला तर मग मान्सूनचा आनंदही लुटूया आणि सुरक्षित मान्सून साजरा करूया….

फोटो पाठवण्यासाठी

  • व्हॉट्सऍप क्रमांक – 9167678594
  • ट्विटर – @ibnlokmattv

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close