अवकाळी पावसाने भाज्या महागल्या

November 12, 2009 9:54 AM0 commentsViews: 7

12 नोव्हेंबर अवकाळी पावसाने भाजीपाल्यावरही परिणाम झाला आहे. बाजारातली आवक घटल्याने भाज्यांचे भाव कडाडले आहेत. फियानमुळे आलेल्या जोरदार पावसामुळे भाज्यांवरही परिणाम झाला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. रोज 500 ट्रक येणार्‍या मार्केटमध्ये गुरुवारी फक्त 150 ट्रक आलेत, त्यामुळे भाज्यांचे भाव वाढलेत. बुधवारपर्यंत बारा रुपयाला मिळणारी कोथिंबीरीची जुडी आता पन्नास रुपयांना घ्यावी लागत आहे.

close