आप सरकार आणि नायब राज्यपालांमध्ये ‘जंग’ सुरूच

June 15, 2015 9:13 AM0 commentsViews:

najib jang vs kejriwal4415 जून : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातला वाद सुरूच आहे. आता निमित्त आहे ते दिल्लीच्या गृह सचिवांचं…नायब राज्यपाल नजीब जंग यांनी नियुक्त केलेले गृह सचिव धरम पाल यांनी आपलं कार्यालय खाली करायचे आदेश देण्याचा विचार दिल्ली सरकार करतंय.

दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी या आशयाचं पत्र लिहिलंय, ते उद्या पाल यांना पाठवलं जाऊ शकतं. पण, मी गृह सचिव म्हणून काम करत राहणार, आणि कार्यालय सोडणार नाही असा पवित्रा पाल यांनी घेतलाय. काही दिवसांपूर्वीच दिल्ली सरकारनं पाल यांची हकालपट्टी केलीय. दिल्ली अँटी करप्शनच्या अध्यक्षपदी एम के मीणा यांच्या नावाची अधिसूचना काढल्याबद्दल त्यांना काढून टाकण्यात आलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close