एमसीएच्या आखाड्यात पवारांविरोधात सेनेची मोर्चेबांधणी सुरू

June 15, 2015 9:24 AM0 commentsViews:

uddhav_on_sharad_pawarअमित मोडक,मुंबई

15 जून : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारांचा चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मोर्चाबांधणी सुरू केलीये.

राजकीय आखाड्यात एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन पक्ष एमसीए निवडणुकीच्या आखाड्यात आमने-सामने आले आहे. त्यामुळे इथंही राजकीय आखाड्याप्रमाणेच वाद रंगलाय. गेल्या दशकभरात पहिल्यांदाच शरद पवारांनाएमसीएमध्ये कुणीतरी आव्हानं निर्माण केलंय. विजय पाटील क्रिकेट फर्स्ट गटाकडून अध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. आणि त्यांना पाठिंबा आहे शिवसेनेचा…’मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती बैठक झाली. यावरुनचं शिवसेना यावेळेस पूर्णताकद एमसीएमध्ये लावणार हे स्पष्ट आहे. विजय पाटील यांना डी.वाय.पाटील स्टेडियमला मॅचेस न्यायच्या आहेत असा आरोपही झाला. आरोपांना उत्तर आणि उत्तरानंतर आरोप हे काही दिवस चालणार आहे. फक्त राष्ट्रवादी नव्हे तर भाजप असा दोघांशी शिवसेनेचा लढा आहे. या निवडणुकीत पक्षीय अभिनीवेश नाही असा दावा वारंवार करण्यात येतोय.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आता प्रतिष्ठेची निवडणूक बनत चाललीये. एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे उद्धव ठाकरे…आता मुंबई क्रिकेटवर वर्चस्व कुणाचं हे बघण्यासाठी 17 तारखेपर्यंत थांबावं लागेलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close