‘आप’ म्हणजे कौरव सैना -योगेंद्र यादव

June 15, 2015 11:23 AM0 commentsViews:

yogendra yadav on aap 415 जून : ‘आम आदमी पार्टी म्हणजे कौरव सेना आहे’ अशा शब्दात ‘आप’चे माजी नेते योगेंद्र यादव यांनी ‘आम आदमी पार्टी’वर टीका केलीये.

जितेंद्रसिंह तोमर यांच्या डिग्री बाबत आम्हाला शंका होती. याची लोकपालामार्फत चौकशी करण्यासाठी आम्ही शिफारस केली होती मात्र तसं झालं नाही, असा खुलासाही योगेंद्र यादव यांनी केला.

तोमर प्रकरणामुळे आता ‘आप’चा चेहरा उघडा पडलाय अशी परखड टीकाही त्यांनी केली. स्वराज अभियानासाठी ते पुण्यात आले होते. निवडणुकीत पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत योगेंद्र यादव यांची आपमधून हकालपट्टी करण्यात आलीये. आपने केलेल्या कारवाईमुळे योगेंद्र यादव यांनी आपवर टीकेचा भडीमार सुरू केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close