‘स्कूल चले हम…’,शाळेचा आज पहिला दिवस

June 15, 2015 8:12 AM0 commentsViews:

school news4415 जून : चेहर्‍यावर दिसणारं कुतुहल आणि मनात असणारी भिती…असं वातावरण आज प्रत्येक शाळेच्या गेटवर होतं. उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू झाल्यात. पहिल्या दिवशी मुलांना शाळेत सोडताना पालकांच्या मनातही हुरहूर होती. हे वातावरण राज्यातील सगळ्याच शाळांमध्ये होतं.

आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुरू होतायत. नव्या वह्या, नवी पाठी, आणि नवी पुस्तकं, डब्बा…अशा सगळ्या वस्तूंनी भरलेलं भलं मोठं दप्तर पाठीवर घेईन विद्यार्थी शाळेला दाखल झाले आहे तर काही निघाले आहे. आपल्या मुलांच्या शाळेचा पहिलाच दिवस म्हणून पालकांनी आपल्या लाडक्या चिमुरड्याला शाळेत नेऊन सोडलंय. पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेतलेल्या काही चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर थोडी भीती होती आणि कुठे रडारड… तर कुठे विद्यार्थ्यांना फूल, चॉकेलेट्स देऊन स्वागत करण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close