नेमाडे म्हणतात, ‘…बारावीनंतर मुलगा मुर्ख बनतो’

June 15, 2015 1:34 PM0 commentsViews:

nemade pune program15 जून : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच असावं, पालक हट्ट करून मुलांना इंग्रजी माध्यमात टाकतात , त्यामुळे बारावीनंतर मुलगा मुर्ख बनून बाहेर पडतो असं वक्तव्य नेमाडे यांनी व्यक्त केलंय. पुण्याच्या एसपी कॉलेजच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.

1914 ते 2014 या शतकातील मराठी साहित्याचा आढावा या विषयावर ते बोलत होते. नेमाडे म्हणतात, “जेव्हा विद्याही उच्च ज्ञानासाठी वापरली जाते तेव्हा मातृभाषा कामी येते. इंग्रजी भाषा कामा येत नाही. कारण, जेव्हा चार वर्षांचा मुलगा शाळेत जातो. तेव्हा त्याचा पाया ही मातृभाषा असते. पण, तेव्हा त्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान मिळतं. इंग्रजी शब्द तर त्याला कळत नाही. मग, बारावी नंतर तो मुर्ख बनतो”.

नेमाडे एवढ्यावर थांबले नाही मी संवदेनशील झालो म्हणून बोलत नाही तर भाषाशास्त्राचा प्राध्यापक म्हणून बोलतो अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या अगोदरही नेमाडे यांनी इंग्रजी भाषेवर टीका केली होती. त्यावेळीही वाद निर्माण झाला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close