युद्ध न झाल्यामुळे लष्करांचं महत्त्वं कमी झालंय -पर्रिकर

June 15, 2015 1:41 PM0 commentsViews:

manohar parrikar15 जून : गेल्या 40-50 वर्षांमध्ये युद्ध न झाल्यामुळे लष्करांचं महत्त्वं कमी झालंय असं वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलंय. अर्थात, याचा अर्थ युद्ध व्हावं, असं मला वाटतं, असं नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं. ते जयपूरमध्ये बोलत होते.

लष्करी अधिकार्‍यांच्या दोन पिढ्या युद्ध न बघताच निवृत्त झाल्या. याचा अर्थ लष्कराला हवा तेवढा मान मिळू नये असा होत नाही, अशी पुष्टीही पर्रिकर यांनी जोडली. परवेझ मुशर्रफ यांच्या अणुबॉम्बच्या धमकीलाही त्यांनी चांगलंच उत्तर दिलं. मुशर्रफ साहेब त्यांच्या स्वतःच्या घरात जाऊ शकत नाहीत, ते भारतात काय शिरतील असा टोलाही पर्रिकर यांनी लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close