पाऊस, प्रेम आणि कविता…

June 15, 2015 1:57 PM0 commentsViews:

चंद्रकांत फुंडे, मुंबई

15 जून : सर्वांनाच हवाहवाशा वाटणार्‍या मान्सूनचं अखेर राज्यभरात सर्वदूर जोरदार आगमन झालंय. या पहिल्यावहिल्या पावसात भिजावसं वाटलं नाही तरच नवल…विशेषतः कवी मंडळी आणि प्रेमीयुगुलांसाठी तर पाऊस म्हणजे एक पर्वणीच असते.पाहुयात पावसाच्या नानाछटा हळूवार उलगडणारा आयबीएन लोकमत हा विशेष वृत्तांत….

हवेत पसरलेला गारवा…ओलंचिंब झालेलं मन…आणि आठवणींच्या गोड सरीत भिजलेली ती आणि फक्त मी…छान कविता सुचताहेन ना…पहिला पाऊस म्हटलं की, बुहतेकांना हे असंच होतं…अशातच मग सोबतीला मस्तपैकी वाफाळलेला चहा आणि गरमागरम बुट्टा असेल तर आहा विचारलायच नको….बरं हा पाऊस फक्त प्रेमी युगुलांना आणि कवी मंडळींना आवडतो असं नाहीतर बच्चेकंपनीसाठी ही
ओलेचिंब भिजण्यासाठी मोठी पर्वणी असते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात हुंदडण्याची मौजमजा काही औरच असते…या ओल्या चिंब भिजण्याच्या नुसत्या कल्पनेनं अगदी आजी आजोबांना फ्लॅशबॅकमध्ये जायला होतं…ज्येष्ठ मंडळी मग मान्सूनच्या निमित्ताने भुतकाळात पाहिलेले पावसाळे मोजत त्या सुमधूर आठवणींमध्ये रममान होऊन जातात…तर असा हा पाऊस…कधी धोधो कोसळणारा…तर कधी रिमझिम सरी बरवणारा…म्हणूनच म्हणावसं वाटतं पाऊस म्हणजे निसर्गाला पडलेलं एक सुंदरसं स्वप्न….सो प्रेक्षकहो आत्तापासूनच मान्सून टुरिझमच्या प्लॅनिंगला लागा…आणि मस्तपैकी हा पावसाळाही एँजाय करा…..

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close