जेजुरी जवळ रेल्वे अपघात

November 12, 2009 10:07 AM0 commentsViews: 70

12 नोव्हेंबर जेजुरी इथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे रेल्वे रुळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. दुरुस्तीचं काम अजूनही चालू असल्यानं इथली वाहतूक बंद आहे. म्हैसूर-अजमेर एक्सप्रेसला पुणे जिल्ह्यातल्या जेजुरी इथं बुधवारी अपघात होउन 11 डबे रूळावरुन घसरले होते. या अपघातात 20 जण किरकोळ जखमी झालेत. तर 5 जण गंभीर जखमी झालेत. म्हैसूर-अजमेर एक्सप्रेसमधून साडेसातशे ते आठशे प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामुळे इथले रेल्वे ट्रॅक पूर्णपणे उखडले गेलेत. त्यामुळे रेल्वेचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला होता. मात्र दुरुस्तीचं काम अजूनही चालूच आहे.

close