बाबासाहेब कुपेकरांची नाराजी दूर

November 12, 2009 10:08 AM0 commentsViews: 4

12 नोव्हेंबर राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांची नाराजी दूर झाली आहे. वसंत डावखरे यांनी बुधवारी त्यांची भेट घेऊन समजूत काढल्याचं समजतं. त्यामुळे कुपेकर यांनी अखेर गुरुवारी विधानसभाध्यक्षांच्या दालनात आमदारकीची शपथ घेतली. विधानसभेचं अध्यक्षपद मिळालं नसल्यानं कुपेकर नाराज झाले होते. पण राष्ट्रवादीचे काही वरिष्ठ नेत्यांनी डावखरे यांची भेट घेऊन कुपेकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वसंत डावखरे अखेर त्यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरले.

close