दापोली आठ दिवस अंधारात

November 12, 2009 12:35 PM0 commentsViews: 2

12 नोव्हेंबरविजेचे खांब पडल्याने दोपाली तालुक्यात पुढचे आठ दिवस वीज येणार नाही. वादळामुळे विजेचे 200 खांब पडलेत. वीज कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्यानं वीज जोडणीचं काम संथ गतीनं सुरू आहे. हे खांब अजूनही रस्त्यातच पडून आहेत. विजेच्या खांबांसोबतच अनेक झाडंही अजून रस्त्यातच पडून आहेत. त्यामुळे रस्तेवाहतूक बंद असून सुमारे 150 गावांमध्ये अजूनही एसटी गाड्या जाऊ शकलेल्या नाहीत.

close