असंही ‘स्वाभिमान’ आंदोलन, जबरदस्तीने केल्या टॅक्सी बंद

June 15, 2015 4:11 PM0 commentsViews:

swabhimani taxi andolan15 जून : काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेनं आज (सोमवारी) जबरदस्तीने आंदोलन करून आपला ‘स्वाभिमान’ दाखवून दिला. सकाळपासून आंदोलन करूनही टॅक्सी बंद होत नसल्यामुळे अखेर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्ती करून टॅक्सी बंद पाडल्यात.

हकीम समिती अहवाल रद्द करणं आणि खाजगी टॅक्सी बंद कराव्यात मागणीसाठी,आज स्वाभिमान संघटना रस्त्यावर उतरलीये. दादर, परळ,भायखळा आंदोलनं करण्यात आली. पण, सकाळपासून या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता मुंबईच्या दादर, लोअर परेल, परेल, लालबाग, भायखळा, सात रस्ता आणि मुलुंड या भागांमध्ये जबरदस्तीने टॅक्सी आणि रिक्षा बंद केल्या जातायत. एवढंच नाहीतर कार्यक र्ते गाड्यांच्या काचा फोडण्याच्या धमक्या देऊन बंद पाडण्यास भाग पाडत आहे. टॅक्सीचं नुकसान होऊ नये म्हणून बर्‍याच टॅक्सी चालकांनी काम थांबवलं आहे. त्यामुळे ऐन पाऊस सुरू असताना सर्वसामान्यांचे मात्र हाल होतायत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close