FTII विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा

June 15, 2015 5:51 PM0 commentsViews:

FTII and gajendra

15 जून : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट म्हणजेच FTIIच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे चांगलचं ‘महाभारत’ रंगलंय. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केलाय. त्यांच्या या आंदोलनाला देशभारातून पाठिंबा मिळात असल्याचा दावा FTII विद्यार्थ्यांना पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला आहे. गजेंद्र चौहान भाजप कार्यकर्ते आहेत आणि शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी राजकीय व्यक्ती नकोत, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. तसंच गजेंद्र चौहान यांच्याकडे कुठलीच दूरदृष्टी नसल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणण आहे.

गजेंद्र चौहान यांनी दूरदर्शनच्या महाभारत मालिकेत युधिष्ठिराची भूमिका केली होती. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन तीव्र करायला सुरुवात केली असून बेमुदत संपच पुकारला आहे. त्यांच्या या आंदोलनाला देशभरातल्या संघटनांकडून पाठिंबा मिळत असल्याचा दावा FTIIच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

कलकत्त्यातील SRFTI या संघटनेकडून तसंच देशभरातील वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांकडून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचा दावा विद्यार्थी करत आहे. विद्यार्थ्यांच्या मुकेश भट सारख्या फिल्म मेकर्सनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे असं या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं आहे. ‘आप’ चे माजी नेते योगेंद्र यादव यांनी या विद्यार्थ्यांची काल भेट घेतली होती. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून आम्हाला अजून कुणीही संपर्क केलेला नाही असं हे विद्यार्थी पत्रकार परिषदेत म्हणाले.

दरम्यान, आपल्यावर होणार्‍या टीकेला गजेंद्र चौहान यांनी उत्तर दिलंय. मी सिनेमाक्षेत्राशी संबंधित माणूस आहे. माझं काम पाहून मग वाटलं तर माझा विरोध करा. माझ्या क्षमतेविषयी शंका उपस्थित करणं चूक असंल्याचं चौहान यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close