वांद्रे कोर्टात ब्लेडने गळा कापून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

June 15, 2015 8:24 PM0 commentsViews:

crimefas

15 जून : वांद्रे कोर्टात आज (सोमवारी) धक्कादायक प्रकार घडला. कोर्टात एका तरुणाने ब्लेडने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुण किरकोळ जखमी झाला असून त्याला जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तरूणाला खटल्याच्या सुनावणीसाठी वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं होतं. पण कोर्टात सुनावणी सुरु असताना त्याने गळा कापण्याचा प्रयत्न केला. न्तिथे असलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी त्याला थांबवलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close