पेट्रोल महाग, डिझेल स्वस्त

June 15, 2015 9:05 PM0 commentsViews:

petrol_price_hike

15 जून : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार झालेली पाहायला मिळत आहे. पेट्रोल महाग तर, डिझेल स्वस्त होणार आहे. डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1 रुपया 35 पैशांनी स्वस्त होणार असून पेट्रोलचे दरात मात्र 46 पैशांची वाढ होणार आहे. नवे दर सोमवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

यापूर्वी मे महिन्यात दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ करण्यात आली होती. 16 मे रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.13 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.71 पैसे इतकी वाढ करून तेल कंपन्यांनी झटका दिला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close