लोहगाव विमानतळाच्या परिसरातली बांधकामं वर्षभरात हटवा – मुंबई हायकोर्ट

June 15, 2015 9:33 PM0 commentsViews:

15 जून : 12Pune-airportपुण्यातील लोहगाव विमानतळ परिसरातली बांधकामं येत्या वर्षभरात हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विमातळ परिसरात राहणारे नागरिक प्रचंड चिंतेत आहेत.

या निर्णयामुळे लोहगाव विमानतळ परिसरात राहणार्‍या हजारो निवृत्त लष्करी अधिकार्‍यांची घरंही जमीनदोस्त होणार आहेत. आपली घरं सुरक्षित राहावीत म्हणून विमानतळ परिसरातील निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्यांनी ठिकठिकाणी बैठका घ्यायला सुरुवात केलीय. उच्च न्यायालयाचा हा निर्णय नागरिकांवर अन्याय करणारा असल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णयही रहिवाशांनी घेतला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close