वसई विरार पालिका निवडणुकीसाठी आज मतमोजणी

June 16, 2015 8:42 AM0 commentsViews:

vasai virar municipal corporation election16 जून : वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) मतमोजणी होणार असून 111 जागांचे निकाल जाहीर होणार आहे. यापैकी 4 जागा या बिनविरोध आहेत.

या निवडणुकीत 367 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागलं आहे. या निवडणुकीत लढत बहुजन विकास आघाडी विरुद्ध सेना तर जनआंदोलन आणि भाजप अशी सरळ लढत होणार आहे.

तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जनता दल या निवडणुकीत यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लढावं लागणार आहे.

वसईमध्ये 115 प्रभागांसाठी 367 उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकुर विरूद्ध इतर सर्व पक्ष असा हा सामना होणार आहे. शिवसेनेने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली.

पण महायुतीच्या भाजप आणि माजी आमदार विवेक पंडित यांचा जनआंदोलन पक्षं प्रमुख प्रतिस्पर्धी असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रचार फारसा दिसुन आला नाही. त्यामुळे वसई विरार पालिकेवर झेंडा कोण फडकावतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

वसई विरार महानगरपालिका निवडणूक
एकूण मतदार 06,76,639
एकूण प्रभाग 115
एकूण उमेदवार 367
एकूण मतदान केंद्र 607
संवेदनशील मतदान केंद्र 117

पोलीस बंदोबस्त
एकूण पोलिस कर्मचारी 2000
2 दंगल नियंत्रण पथक

प्रमुख लढत
बहुजन विकास आघाडी आरपीआय (A)
विरुद्ध
शिवसेना, भाजप आणि जनआंदोलन पक्ष

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close