बारामतीत शरद पवार आणि अजितदादांवर जमीन हडपल्याचा आरोप

June 16, 2015 9:02 AM0 commentsViews:

78sharad_pawar_on_ajit_pawar_16 जून : पदाचा गैरवापर करुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामतीतील एक संस्थेची जमीन हडपल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रवी बर्‍हाटे यांनी केलाय.

बारामती इथल्या कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची 73 एकर 60 गुंठा जमीन पवारांनी हडपल्याचा त्यांनी म्हटलंय. या संस्थेची सरकारी जमीन विद्या प्रतिष्ठान या शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेला फक्त 1 कोटी 28 लाख 39 हजार 250 रुपयांत विक्री केल्याचं दाखवण्यात आलंय. मात्र, सरकारी हिशेब आणि रेडिरेकनरच्या रेट प्रमाणे जमिनीची 2014 साली 13 कोटी पेक्षा जास्त आहे असल्याचा दावा बर्‍हाटे यांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close