उद्धव ठाकरेंचा ‘बाऊंसर’, ‘पवार स्कोअरही करत नाही आणि रिटायरही होत नाही’

June 16, 2015 11:51 AM0 commentsViews:

uddhav_on_sharad_pawar16 जून : सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर रिटायर झाले. पण आपले अध्यक्ष काही रिटायर व्हायला तयार नाही, स्कोअरही करत नाही. तरीही बॅट घेऊन आणि पॅड लावून उभे आहे असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना लगावला.

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे 48 तास उरले असताना उद्धव ठाकरे यांनी एमसीएच्या मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांवर एकच हल्लाबोल केला. शरद पवारांचं नाव न घेता, खेळाडू रिटायर झाले पण अध्यक्ष काही रिटायर झाले नाही. बरं हे स्कोअरही करत नाही. स्कोअर शुन्य, कितीही बॉल टाका पण स्कोअर काही वाढतच नाही.

पण, तरीही तिकडे बॅट घेऊन आणि पॅड लावून उभे आहे असा शेलक्या शब्दात टोला लगावला. तसंच नुसतं कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून डावा पाय पुढे, उजवा पाय मागे असं सांगत बसायचं नाही. म्हणून विजय पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उभा आहे. तुमचे जसे उद्योग धंदे चालता तसेच आमचे पिढ्यांपिढ्या संबंध आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एमसीएची निवडणूक हा व्यक्तीगत क्रिकेटसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका. हा मुंबईच्या क्रिकेटचा प्रतिष्ठेचा प्रश्न करा असंही उद्धव म्हणाले. तसंच मुंबईत क्रिकेटला जुने दिवस परत आणायचे असतील तर क्रिकेट फर्स्ट गटाला बहुमतानं निवडून द्या, असं आवाहनही त्यांनी केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close