दारू पिऊन महिलेचा धिंगाणा, पोलिसांशी घातली हुज्जत

June 16, 2015 12:34 PM0 commentsViews:

shivani bali _16 जून : जान्हवी गडकरनं ड्रंक ड्राईव्ह अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत पुन्हा अशाच स्वरुपाची घटना सोमवारी रात्री घडलीये.

मुंबईत रात्री दारू पिऊन गाडी चालवणार्‍या एका महिलेला पोलिसांनी अडवल असता तिने भर रस्त्यावरच तमाशा केला. शिवानी बाली असं या महिलेचं नाव आहे. तब्बल दोन तास ती पोलिसांशी हुज्जत घालत होती.

दारुचा अंमल या महिलेवर एवढा चढला होता की, तिनं पोलिसांशीच नाही तर इथं उपस्थित असलेल्या पत्रकारांशीही असभ्य वर्तन केलं. पत्रत्रकारांवर ही महिला धावून गेली आणि कॅमेर्‍या मनला कँमेरा फोडण्याची धमकी देत शिवीगाळही केली.

अनेकदा सांगूनही ही महिला तब्बल 2 तास गाडीतून उतरायलाच तयार नव्हती. तिने पळून जाण्याही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तिला गाठलंच. तरीही ही महिला गाडीतच बसून राहिली. आणि जोरजोरात गाणी लावली आणि गाडीतच सिगरेट्स ओढत बसली.

शेवटी नाईलाजानं पोलिसांनी गाडीची काच फोडून तिला बाहेर काढलं. गाडीतून बाहेर आल्यानंतर तिला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. तिचं लायसन्स आणि गाडी जप्त करण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close